मुंबई : जगभरात आज 25 सप्टेंबरला जागतिक कन्या दिन (International Daughters' Day)  साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त स्टार्स पासून राजकीय नेत्यांपर्यंत आणि सर्वसामान्य आई-वडील देखील आपआपल्या मुलीचे फोटो पोस्ट करून मुलींना कन्या दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याचप्रमाणे क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) देखील त्याची लेक सारा तेंडूलकरसाठी खास पोस्ट लिहत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या पोस्टची खुप चर्चा होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) लेजेंडस लीगमध्ये (Legends League) व्यस्त असताना देखील त्याने मुलीसाठी खास पोस्ट लिहली आहे. जागतिक कन्या दिनानिमित्त (International Daughters' Day) सचिन तेंडूलकरने सारा तेंडूलकरचा खास फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टची कॅप्शन वाचून तो भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले होते.


सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या इंस्टाग्राम पेजवर सारा तेंडुलकरचा पाळीव कुत्र्यांसह फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सारा तेंडूलकर (Sara Tendulkar) आणि सचिन तेंडूलकर या बाप-लेकीची जोडी खुपच सुंदर दिसत आहे. य़ा फोटोच्या कॅप्शनला सचिन लिहतो की, माझ्या अंगाखांद्यावर खेळत मोठी झालीस. पण आजही तू माझ्यासाठी तशीच आहे. हा दिवस मला त्या प्रत्येक क्षणांची आठवण करून देतो. त्या आठवणींमुळे मला वेगळाच आनंद मिळतो. जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा सारा!”. या त्याच्या पोस्टमध्ये तो भावनिक झाल्याचे अनेकांना वाटले. 



दरम्यान सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) ही पोस्ट करताच त्यावर अनेक लाईक्स कमेटं आल्या आहेत. तसेच त्याच्या या पोस्टची खुप चर्चा आहे.  


सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar)  सध्या लेजेंडस लीगमध्ये व्यस्त आहे. या लीगमध्ये सचिनच्या नेतृत्वाखाली इंडिया लेजेंडसचा संघ खेळत आहे. या लीगमध्ये सचिन तेंडूलकर चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले आहे. सचिनच्या लेजेंडस लीगमधील खेळीचे कौतूक होत आहे.