मुंबई : भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik)  विभक्त होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. सानिया मिर्झाच्या (Sania Mirza)  इन्स्टाग्राम स्टोरीवरून या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या चर्चावर अद्याप सानिया मिर्झा आणि शोएब मलिकक़डून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही आहे. त्यात आता सानिया मिर्झा आणि शोएब मलिक आधी असे अनेक पाकिस्तानी क्रिकेटर (Pakistani Cricketer) आहेत ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लगीनगाठ बांधली होती, तर काहींच्या अफेअरच्या चर्चा होत्या. हे पाकिस्तानी क्रिकेटर कोण होते ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : भारताची सानिया मिर्झा-शोएब मलिक यांच्यात 'तलाक'?, सानियाची पोस्ट व्हायरल!



सानिया मिर्झा - शोएब मलिक


प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या लव्हस्टोरीने दोन्ही देशात खबबळ माजवली होती. या लव्हस्टोरीनंतर सानियाच्या देशभक्तीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कारण त्यावेळी भारत-पाकिस्तानमध्ये नेहमीच बॉर्डरवर युद्ध व्हायचं. अशा कठीण प्रसंगात दोघांच नात टिकलं आणि त्याचे पुढे जाऊन लग्न देखील झालं. 


हे ही वाचा : पहिल्या भेटीत इग्नोर...पण नंतर असं जडलं प्रेम!


सानिया (Sania Mirza) आणि शोएबने (Shoaib Malik) जवळपास 5 महिने एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय़ घेतला होता. 12 एप्रिल 2010 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली होती.लग्नाचे सर्व विधी सानियाच्या मूळ गावी हैदराबादमध्ये पार पडले. यानंतर लाहोरमध्ये रिसेप्शन पार पडले होते. 



हसन अली-शामिया आरजू


पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली (Hassan Ali) आणि शामिया आरजूची (Samia Arzoo) लव्हस्टोरी देखील खुप खास आहे. हरियाणात राहणारी शामिया आरजू (Samia Arzoo) एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर जेट एअरवेजमध्ये एअर होस्टेस म्हणून रुजू झाली होती. दुबईत असताना शामियाची पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीशी (Hassan Ali) डिनरदरम्यान भेट झाली होती. या भेटीनंतर हसनला शामिया आवडला होता.हसन आणि शामियाने जवळपास 2 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2019 मध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला आता 3 वर्ष पुर्ण झाली आहेत. 



मोहसीन खान-रीना रॉय


पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू मोहसीन खान (Mohsin Khan) आणि बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय (Reena Roy) यांनी देशाच्या सीमा ओलांडून लग्न केलं होत. दोघांनी लाहोरमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. मोहसीन (Mohsin Khan) आणि रीना यांना (Reena Roy) जन्नत नावाची मुलगी देखील आहे. लग्नाच्या काही वर्षांनी रीना आणि मोहसीन यांचा घटस्फोट झाला होता. 


मोहसीनला (Mohsin Khan) लंडनमध्ये कुटुंबासोबत स्थायिक व्हायचे होते, पण रीना याने खूश नव्हती. हेच त्यांच्या घटस्फोटाचे कारण असल्याचे मानले जात होते. घटस्फोटानंतर रीनाला (Reena Roy) मुलीचा ताबा मिळाला. त्यांनी आपल्या मुलीचे नावही बदलून सनम ठेवले.



इम्रान खान - झीनत अमान


पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान (Imran Khan) आणि बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांच्या लव्हस्टोरीची त्याकाळी खुप चर्चा रंगली होती. नोव्हेंबर 1979 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर होता. त्यावेळी इम्रान खान (Imran Khan)  पाकिस्तानचा कर्णधार होता. तेव्हापासून झीनत (Zeenat Aman) आणि इम्रान अनेकदा एकत्र फिरताना दिसले होते. त्यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. त्यांच्या लग्नाच्या अफवाही उडू लागल्या होत्या.


दोघांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा सुरु असताना इम्रान खानने (Imran Khan) जेमिमा गोल्डस्मिथशी आणि झीनत अमानने (Zeenat Aman)  मजहर खानशी लग्न केले होते. मात्र, दोघांनीही त्यांच्या अफेअरला कधीही जाहीरपणे स्वीकार किंवा नाकारले नाही.



वसीम अक्रम-सुष्मिता सेन


माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांची 2008 मध्ये 'एक खिलाडी एक हसिना' या रिअॅलिटी शोच्या सेटवर भेट झाली होती. या शोमध्ये दोघेही जजच्या भूमिकेत होते. यावेळी वसीमचा (Wasim Akram) विवाह झाला होता. मात्र तरीही या दोघांच्या जवळीकतेची चर्चा सेटवर सुरू झाली.


 2009 मध्ये वसीमची (Wasim Akram) पत्नी हुमा हिच्या मृत्यूनंतर दोघे जवळ आले होते. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच काही बोलले नाहीत. दोघे एकत्र हँग आउट करताना आणि अनेक चित्रपटांच्या स्क्रीनिंगला हजेरी लावताना दिसले. यानंतर दोघांच्या डेटिंगच्या अफवा उडू लागल्या होत्या. या अफवांनंतर सुष्मिता सेनने (Sushmita Sen) वसीमला आपला मित्र म्हणून संबोधले आणि या अफवा खोट्या असल्याचे म्हटले होते. 


तर या होत्या पाकिस्तानी क्रिकेटरच्या लव्हस्टोऱ्या, ज्यामध्ये त्यांनी सीमा ओलांडून प्रेम केले होते व लग्नगाठ बांधली होती.