शिखर-हार्दिकचा ‘बाथरूम डान्स’व्हायरल
हार्दिक पांड्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केलायं.
मुंबई : आयर्लंडला २-० अशी मात दिल्यानंतर इंग्लंडविरूद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आजपासून बहुप्रतिक्षीत असलेल्या इंग्लंड दौऱ्याला सुरूवात होत आहे. ही मालिका आयर्लंड इतकी सोपी जाणार नसल्याने टीम इंडियासमोर तगडं आव्हानं उभ राहिलंय. तरीही टीम इंडियाचे खेळाडू या सर्वाचा ताण न घेता एन्जॉय करताना दिसताहेत. मैदानातील आपल्या अष्टपैलू खेळीने प्रेक्षकांना तोंडात बोटं घालायला भाग पाडणाऱ्या हार्दिक पांड्या आणि सलामीवीर शिखर धवन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. मैदानात आणि मैदानाबाहेरही हे दोघेही रिलॅक्स मूडमध्ये दिसत असतात. हार्दिक पांड्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केलायं. यामध्ये बाथरूमच्या आरशासमोर हे दोघेही नाचताना दिसताहेत.
आज भारत विरूद्ध इंग्लंड
भारत आणि इंग्लंडमध्ये आज पहिली टी-२० मॅच रंगणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत इंग्लंडविरुद्ध ३ टी-२०, ३ वनडे आणि ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. टी-२० सीरिजआधीच भारताला मोठा धक्का लागला. जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे टी-२० सीरिजला मुकणार आहेत. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० वेळी बुमराहच्या अंगठ्याला दुखापत झाली. स्कॅनिंगनंतर बुमराहचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. वनडे सीरिजसाठी बुमराह फिट होईल अशी आशा भारतीय टीमला आहे. तर फूटबॉल खेळताना वॉशिंग्टन सुंदरच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तोही टी-२० सीरिजमधून बाहेर झाला आहे.