नवी दिल्ली : आयपीएल २०२० चा १३ वा सिझन कोरोना वायरसमुळे युएईमध्ये खेळली जातेय. स्टेडीयममध्ये पहील्यासारखी गर्दी दिसत नाहीय तरीही फॅन्समध्ये आयपीएलजी क्रेझ कमी झाली नाहीय. या सिझनमध्ये तरुण खेळाडुंची हवा असून सर्व खेळाडुंकडे चांगले खेळाडू आहेत. अनुभवी खेळाडुंना बाहेर बसवून तरुणांना संधी देण्यात आलीय. या लिस्टमध्ये ख्रिस गेलदेखील आहे. गेलसारख्या मजबूत खेळाडुला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी न दिल्याबददल सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्हाला वाटत गेल नेहमी हसत आणि मस्त राहतो पण टीमबाहेर राहणे त्यालाही खूपत असेल असे गांगुलीने म्हटलंय. या अशा गोष्टी आहेत ज्या पाहणे आणि समजण्याची गरज आहे. आयपीएलच्या आत खूप स्पर्धा सुरु असल्याचे गांगुली म्हणाला. 



पूर्ण टुर्नामेंट खूप मस्त चाललीय. मी कोणता एक क्षण निवडू नाही शकत. केएल राहुलची बॅटींग, शिखर धवनची बॅटींग, काही छान फिल्डींग, जसप्रित बुमराहची बॉलिंग, एनरिच नॉर्टेज आणि रबाडाची बॉलिंग, मोहम्मद शमीची बॉलिंग, या फॉर्मेटमध्ये मयंक अग्रवालची फलंदाजी देखील वाखण्याजोगी असल्याचे गांगुली म्हणाला. 


या सिझनमध्ये तरुण खेळाडू आपल्या प्रदर्शनाने सर्वांची मनं जिंकली आहेत. तर कित्येक अनुभवी खेळाडुंना अद्याप संधी मिळाली नाहीय. ख्रिस गेल याचे उदाहरण आहे. गेलला किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये प्लेईंग इलेव्हनमध्ये निवडला गेला. आपल्या पहिल्या मॅचमध्ये गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरोधात चांगली बॅटींग करत हाफ सेंचुरी केली होती. गेलशिवाय चेन्नईतर्फे इमरान ताहीर असा खेळाडू आहे ज्याला मागच्या सिझनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.