सचिनसोबत गल्ली क्रिकेट खेळलेल्या मुलांसोबत झी २४ तासचा खास संवाद
आम्ही बोलतोय तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरबद्दल....कारण सचिन आपल्या गाडीतून जात असताना अचानक काही मुलं क्रिकेट खेळताना पाहिलं आणि सचिनलाही हा खेळ खेळण्याचा मोह आवरता आला नाही.
मुंबई : बांद्र्यातल्या टीचर्स कॉलनीतील द रेड चारकोल या हॉटेलमध्ये काम करणा-या मुलांनी चक्क क्रिकेटचा देव पाहिला...या क्रिकेटचा देवासोबत एका रात्री खेळही खेळला...हो आम्ही बोलतोय तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरबद्दल....कारण सचिन आपल्या गाडीतून जात असताना अचानक काही मुलं क्रिकेट खेळताना पाहिलं आणि सचिनलाही हा खेळ खेळण्याचा मोह आवरता आला नाही....त्यामुळे चक्क रस्तावर रात्री त्याने या मुलांसोबत क्रिकेटचा खेळला. सचिनसोबत क्रिकेट खेळण्याचा अनुभव कसा होता...त्यावेळी नेमकं काय घडलं, सचिन त्यांच्यासोबत कसा खळायला आला...हा सर्व अनुभव पाहा झी 24 तासवर...या मुलांसोबत बातचित केलीय आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी.