मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सुरेश रैना आज त्याचा ३३वा वाढदिवस साजरा करत आहे. २००५ मध्ये वनडे इंटरनॅशनल क्रिकेटमधून डेब्यू करणाऱ्या रैनाने आपल्या फलंदाजीने एक वेगळी ओळख निर्माण केली. फलंदाजीसह रैनाची जबरदस्त फिल्डिंगही मैदानावर पाहायला मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रैना भारताकडून क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा पहिला खेळाडू आहे. डाव्या हाताने खेळणाऱ्या या फलंदाजाने, सामन्यांमध्ये खेळलेल्या अनेक अविस्मरणीय खेळी चाहत्यांच्या आजही लक्षात आहेत. 


इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सर्वाधिक मॅच खेळणाऱ्या रैनाच्या वाढदिवशी सोशल मीडियावर एक गाणं व्हायरल होत आहे. सुरेश रैना आपल्या सहकाऱ्यांसह हॉटेलमध्ये गात असतानाचा हा व्हिडिओ आहे. बीसीसीआयने हा व्हिडिओ शेअर करत सुरेश रैनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 



याशिवाय क्रिकेटविश्वातूनही अनेकांनी रैनाला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.







उत्तर प्रदेशच्या मुरादनगरमध्ये २७ नोव्हेंबर १९८६ मध्ये जन्मलेल्या रैनाने भारतीय संघाकडून आतापर्यंत १८ टेस्ट मॅच आणि २२६ वनडे इंटरनॅशनल खेळल्या आहेत. वनडे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये रैनाच्या नावे ५६१५ धावांचा रेकॉर्ड आहे. ज्यात ५ शतकं आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.