Virat Kohli Favorite Actress : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली शनिवारी 34 वर्षांचा झाला. आता विराट ऑस्ट्रेलियामध्ये असून टी-20 विश्वचषक खेळत आहे. विराटला वाढदिवसानिमित्त त्याला देशभरातून अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. विराटबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहित आहे का?, विराटची पत्नी अनुष्का शर्मा असली तरी त्याची लहानपणी आवडती अभिनेत्री वेगळीच होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवडती अभिनेत्री कोण होती?
विराट कोहलीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, लहानपणी त्याला कोणती अभिनेत्री आवडायची. त्यानंतर कोहलीने सांगितले की, त्याला लहान वयातच करिश्मा कपूर आवडायची. विराटने 2017 मध्ये अनुष्का शर्मासोबत लग्न केले. या जोडप्याला वामिका नावाची मुलगी तिचा जन्म गेल्या वर्षी 11 जानेवारीला झाला होता.


कोहलीने आतापर्यंत 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्‍याच्‍या नावावर कसोटीमध्‍ये 27 कसोटी, 28 अर्धशतकांसह 8074 धावा आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये 43 शतके आणि 64 अर्धशतकांसह एकूण 12344 धावा केल्या आहेत. T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये त्याने एक शतक आणि 36 अर्धशतकं ठोकून एकूण 3932 धावा केल्या आहेत.


दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळून या खेळात आपली कारकीर्द घडवणारा विराट आज आपला 3 वा वाढदिवस साजरा करत आहे.  महान फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. विराट मैदानात उतरला की करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या त्याच्याकडून आशा असतात. विराटने एकट्याने टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. सध्या तो टी-20वर्ल्ड कपमध्ये धावांचा जोरदार पाऊस पाडत आहे. विराटने या स्पर्धेत दमदार फलंदाजी केली असून त्याने आतापर्यंत 4 पैकी 3 सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत.