नवी दिल्ली : टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहली देखील काही प्रमाणात का होईना अंधश्रद्धा मानतो हे समोर आलंय. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुनच हे त्याच्या चाहत्यांना समजलंय. इंग्लिश फुटबॉल कल्ब मॅनचेस्टर सिटीचे कोच पेप गुआर्डियोलासोबत इंस्टाग्राम लाईव्हवर गप्पा मारताना विराटने असंच काहीस विधान केलंय, ज्याची खूप चर्चा झालीय. मला पांढऱ्या बुटांमध्ये बॅटींग करायला आवडतं. हे माझ्यासाठी अंधश्रद्धेप्रमाणे आहे असे तो म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुआर्डियोलांना त्यांच्या खेळाच्या दिवसात बुट बदलण्याबद्दल कोहलीने विचारले. मी खेळायचो तेव्हा काळ्या रंगाची बुट घालायचो. आता काळ्या रंगाची बुट शोधण कठीण असल्याचे तो म्हणाला. एक दिवशी मी लाल रंगाची बुट घालून गेलो तर मॅनेजर जॉन क्रायफ यांनी पाहीलं आणि मला काळ्या रंगाची बुट घालण्यास सांगितल्याचे गुआर्डियोलांनी सांगितले.



कोरोना काळात प्रेक्षक नसल्यामुळे सर्व मॅच या फ्रेंडशिप मॅचप्रमाणे वाटतायत. प्रेक्षकांच्या अभावी पहिल्यासारख काही राहीलं नाही. मॅच सुरु राहील्या पाहीजेत. गोष्टी थांबायला नकोत. जेव्हा सर्व काही सुरळीत होईल तेव्हा प्रेक्षक स्टेडीयममध्ये परततील असेही ते म्हणाले. 


आम्हाला मॅच पाहताना प्रेक्षकांची कमी जाणवते. प्रेक्षकांशिवाय खेळणं विचित्र दिसत असेही ते म्हणाले.