चेन्नई: भारताविरुद्ध होणाऱ्या क्रिकेट सामन्यासांठी ऑस्ट्रेलिया टीमने कंबर कसली आहे.ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यापेक्षा मोठी मालिका असू शकत नसल्याचे कोच डेविड सेकर यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 भारताविरूद्ध होणाऱ्या आगामी मालिकेत वेगवान बॉलर पेट कमिन्स पाच एकदिवसीय सामन्यात खेळावा अशी टीम मॅनेजमेंटची इच्छा असल्याचे काळजीवाहू कोच डेविड सेकर यांनी सांगितले. "आता आम्ही त्याला सर्व सामन्यांमध्ये खेळविण्यासाठी एक धोरण तयार करत आहोत. त्याच्या शेड्युल्डची जाणीव आहे, परंतु ही महत्त्वाची मालिका असल्याचे ते म्हणाले. मुख्य कोच डॅरेन लेहमनच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज प्रशिक्षक ही भूमिका बजावत आहे.


प्लॅन ए 'नुसार कमिन्सला भारताविरुद्धच्या सर्व सामन्यांमध्ये खेळविले जाईल आणि त्याला विश्रांती देणे हा ' प्लॅन बी ' असेल. मिशेल स्टार्क, जोश हाझलवुड आणि जेम्स पॅटिन्सन यांना दुखापतीमुळे कमिन्स वर सर्वांचे लक्ष लागले आहे.