नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले. कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर झालेल्या रिसेप्शनला क्रिकेट आणि बॉलिवुड विश्वातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.


मॅग्झीनच्या कर्व्हरसाठी फोटोशूट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर दोन दिवसात एका मॅग्झीनच्या कर्व्हर पेजवर दोघं एकत्र झळकले. याचे फोटोज झहीर आणि सागरिकाने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. आता या फोटोशूटचा एक व्हिडोओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटोशूट ऑक्टोबरमध्ये झाले होते. 
मॅग्झीनच्या जस्ट मॅरीड विशेषांकात दोघं झळकतील. 



नात्याचा खुलासा


२०१७ च्या आयपीएल दरम्यान झहीर आणि सागरिकाने आपल्या नात्याचा खुलासा केला. त्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला.