मुंबई विद्यापीठाच्या घोळावर आदित्य ठाकरेंची टीका
कारण ते विद्यार्थ्यांचं ऐकायचे आणि त्यांना कुलगुरू भेटायचे. मात्र आता राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागतोय.
मुंबई : शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठाच्या घोळावर टीका केली. विद्यापीठातला कारभार बघता मागच्या शासनातले मंत्री आणि कुलगुरू बरे होते का ? असा प्रश्न पडतो.
कारण ते विद्यार्थ्यांचं ऐकायचे आणि त्यांना कुलगुरू भेटायचे. मात्र आता राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागतोय.
विद्यापीठावर सुमोटो दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विद्यापीठाचा कारभार चालविण्यात कुलगुरू पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.