मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) चा 12 वीचा निकाल 13 जुलैला लागल्यानंतर आता 10 वीच्या निकालाची तारीख देखील जाहीर झाली आहे. सीबीएसई बोर्डाचा 10 वीचा निकाल 15 जुलैला लागणार आहे. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

CBSE बोर्डाचा 10वीचा निकाल cbseresults.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. सीबीएसईच्या अॅपवर देखील निकाल पाहता येईल.


सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE)चा 12 वीचा निकाल 13 जुलैला लागला होता. CBSE Class XII Results विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in वर पाहता येईल.


1. cbseresults.nic.in वर जा.


2. आपला रोल नंबर टाका.


3. शाळेचा नंबर टाका.


4. सेंटर नंबर टाका


5. एडमिट कार्ड नंबर टाका


6. कॅप्चा बॉक्स भरा.


7. सबमिट बटणवर क्लिक करा.


खालील वेबसाईट्सवर पाहता येणार निकाल


cbseresults.nic.in


cbse.nic.in


results.nic.in