मुंबई :  नाताळ किंवा ख्रिसमसचा आठवडा सुरू झाला की वातावरणामध्ये सेलिब्रेशनचे रंग दिसायला सुरूवात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिसमस आणि नववर्षाचे सेलिब्रेशन हे गिफ्ट्स शिवाय अपूर्ण असते. त्यामुळे यंदा तुम्ही सिक्रेट सॅन्टा बनून कोणाला गिफ्ट्स देणार असाल तर ते गिफ्ट आकर्षकपणे पॅक करणंदेखील गरजेचे आहे.  


गिफ्ट पॅकिंगच्या खास आयडिया 


गिफ्ट पॅकिंग करण्यासाठी तुम्ही गिफ्ट पेपरप्रमाणेच प्लॅस्टिक पेपर किंवा कार्डबोर्डचा वापर करू शकता तसेच त्याला अधिक आकर्षक स्वरूप दिल्यास तुम्ही त्यापासूनही गिफ्ट बॉक्स बनवू शकता.  


चक्क सेलो टेपचा वापर न करताही गिफ्ट पॅकिंग करता येते. ही खास ट्रिक पाहण्यासाठी तुम्हांला हा व्हिडिओ पहायलाच हवा 




वस्तूंप्रमाणेच गिफ्टचं पॅकिंगही बदला 


काही वेळेस आपण सार्‍या गिफ्ट्सना एकाच प्रकारचे पॅकिंग करतो. यामुळे त्या गिफ्ट्सचा लूक बिघडू शकतो. त्यामुळे तुम्ही गोलाकृती बाटली गिफ्ट करत  असाल तर त्याला साजेसे पॅकिंग करा. तसेच चौकोनी बॉक्समध्ये एखादे गिफ्ट असेल तर त्याला त्यानुसार हटके गिफ्ट पॅकिंग करा.म्हणजे गिफ्ट इतकेच त्याचे पॅकिंगही छान दिसेल.