मुंबई : राज्य सरकारने (Maharashtra Government) दिवाळीची (Diwali ) मोठी भेट शाळांना (Holiday Diwali gift ) दिली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या शाळांना दिवाळीची कमी केलेली सुट्टी (School Holiday)  वाढवली आहे. आता दिवाळीची सुट्टी ( Diwali Holiday ) नऊ दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे शाळांची सुट्टी पाच वरून चौदा दिवसांवर गेली आहे. आधी १२ ते १६ नोव्हेंबर अशी सुट्टी देण्याचा निर्णय झाला होता. पण आता सात ते २० नोव्हेंबर सुट्टी जाहीर झाली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आग्रहामुळे अखेर सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांनी सुट्टी वाढविण्याची मागणी केली होती. तसेच दिवाळी सुट्टी कमी करणारा निर्णय मागे, असे आवाहन केले होते. त्यानंतर होणारा विरोध लक्षात घेऊन दिवाळी सुट्टी कमी करणारा निर्णय अखेर शिक्षण विभागाने मागे घेतला आहे. २० नोव्हेंबर पर्यंत सुट्टी जाहीर केलीय. पाच दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर केल्याचा निर्णय काल शिक्षण विभागाने जाहीर केला होता. त्याला शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांनी कडाडून विरोध केला होता. शिक्षक भारतीने राज्यभर या निर्णयाची होळी केली होती. आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. अखेर शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टी कमी करणारा निर्णय मागे घेतला. 


शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षात शिक्षकांना ७६ सुट्ट्या घेण्याचा अधिकार दिलेला आहे. दरवर्षी शिक्षकांना १८ दिवसाची दिवाळीची सुट्टी दिली जाते. कोरोनाचे कारण पुढे करून आणि बालदिन सप्ताहासाठी शिक्षण विभागाने या वर्षी केवळ पाच दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. यासाठी शिक्षक भारतीने निषेध केला आहे, असं शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले.


मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन जाहीर झाल्यापासून  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कोविड ड्युटी करत आहेत. ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम करत आहेत. मे महिन्यामध्ये लाॅकडाऊनमुळे शिक्षकांना कर्मचाऱ्यांना स्वतःच्या गावी सुद्धा जाता आलेले नाही. १५ न पासून नियमितपणे ऑनलाईन शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांना तासनतास ऑनलाईन शिक्षणासाठी बसून राहावे लागत आहे. बालकांच्या मानसिक स्थितीचा विचार करून दिवाळीची सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली होती.