पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : शिक्षणपद्धती आता प्रचंड चुरशीची आणि स्पर्धात्मक झाली आहे. मुलाचं भविष्य हे त्यांच्या मार्कांवर अवलंबून असल्यासारखं पालक मुलांना वागवतात. परीक्षा, मार्क आणि वाढत्या प्रेशरमुळे मुलांचं निरागस भावविश्व कुठे तरी लोप पावताना दिसून येतय. परंतू 'फन एंड लर्न' ( Fun and Learn) या शिक्षण पध्दतीमुळे मुलाचं शिक्षण हे आनंदीत आणि सुखकर होणार आहे. काय आहे शिक्षणांची ही संकल्पना चला पाहूयात...


शिक्षण पद्धत जगभरात लोकप्रिय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फन एंड लर्न' ( Fun and Learn) या संकल्पनेवर आधारित 'जॉली फोनिक' ( Jolly Phonic)  शिक्षण पद्धती लहान मुलांना प्री-स्कूल स्तरावर शिकवण्यासाठी जगभरात लोकप्रिय होत आहे. 'फन एंड लर्न' ही शाळा इंदूर शहरातील गोपूर येथे 2 वर्षापासून सुरु आहे. 'जौली फोनिक' ही शिक्षण पद्धती मोठ्या प्रमाणात प्रसिद्द होत असल्याने पालकाचं कल या शिक्षण पद्धतीकडे वळताना दिसून येतोय.


'जॉली फोनिक' म्हणजे काय?


'जॉली फोनिक' (Jolly Phonic) ही अशी शिक्षण प्रणाली आहे. ज्यामध्ये 2 ते 7 वर्षे वयोगटातील मुलांना फ्लॅश कार्ड, ध्वनी आणि बॉडी अॅक्शनद्वारे बोलणे आणि वाचणे शिकवले जाते. जेव्हा शिक्षक 'B' वर्णमाला दाखवतात, तेव्हा त्याच्या आवाजासोबत 'B' कृतीसह देखील सांगतात, ज्यामुळे मुले खेळत-खेळत अनेक शब्द वाचायला आणि बोलायला शिकतात.


स्पेशालिस्ट स्कूल यूसीकिड्स


यूसीकिड्स 'UCKINDES' शाळा ही भारत, इजिप्त, चीन, मलेशिया आणि इराण या 5 देशांमध्ये जागतिक उपस्थिती असलेले हे आंतरराष्ट्रीय प्रीस्कूल आहे. तसेच जॉली फोनिक्सची स्पेशालिस्ट शाळा आहे. UC Kindies हा UC इंटरनॅशनल कॉर्पोरेशनचा एक भाग आहे. 'UCKINDES' शाळेच्या सेवा गेल्या 2 वर्षांपासून उपलब्ध आहेत.


यूसीकिड्सची खासियत


मुलांना सामान्य एबीसीडी ( ABCD) शिक्षण देण्याऐवजी जॉली फोनिकद्वारे मुलांना वर्णमाला ज्ञान दिले जाते. येथे कला आणि विज्ञानाची ओळख एका खास पद्धतीने केली जाते. ज्याद्वारे मुले व्यावहारिक शिक्षण घेतात. ही 'यूसी किंडीज'च्या (UCKINDES) हे वैशिष्ट्य आहेत. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक सुरक्षिततेकडे यूसीकिड्स विशेष लक्ष देते. आपल्याकडेही मुलांना फ्लॅश कार्ड, (flash card) ध्वनी आणि शरीर कृतीद्वारे बोलणे आणि वाचायला शिकवल्यास नक्कीच मुलांचा शिक्षणाकडे कल वाटेल आणि आनंदाने शिक्षण घेतील.