धीरुभाई अंबानी शाळेची फी किती आहे, जाणून घ्या...
क्रिकेटर सचिन तेंडुलकर, बॉलिवूड किंग शाहरुख खान, अभिनेत्री श्रीदेवी, ऐश्वर्या राय बच्चन, परफेक्शनिस्ट आमिर खान यांची मुलं ज्या शाळेत शिकलीत किंवा शिकत आहेत त्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी किती असेल याचा अंदाजा तुम्ही लावू शकाल...?
मुंबई : क्रिकेटर सचिन तेंडुलकर, बॉलिवूड किंग शाहरुख खान, अभिनेत्री श्रीदेवी, ऐश्वर्या राय बच्चन, परफेक्शनिस्ट आमिर खान यांची मुलं ज्या शाळेत शिकलीत किंवा शिकत आहेत त्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी किती असेल याचा अंदाजा तुम्ही लावू शकाल...?
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी २००३ मध्ये आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ मुंबीत धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा पाया रचला. सध्या ही शाळा भारतातील टॉपच्या शाळांमध्ये गणली जाते. त्यामुळे ही शाळा सेलिब्रिटीजची पहिली पसंद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत एलकेजी ते बारावीपर्यंत वर्ग चालतात. शाळेत सीआयएसई, सीआयई, आयसीएसई, आयजीसीएसई बोर्ड आहेत. ११ आणि १२ साठी खास इंटरनॅशनल बेकालुरेटचा आयबी डिप्लोमा दिला जातो. या शाळेची प्रवेश फी...
- केजी ते सातवी पर्यंत - १ लाख ७० हजार रुपये
- आठवी ते दहावी पर्यंत (आयसीएसई बोर्ड) - १ लाख ८५ हजार रुपये
- दहावी ते बारावी - ४ लाख ४८ हजार रुपये
शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी शाळेच्या वेबसाईटवर संपर्कासाठी पत्ता आणि फोन नंबर देण्यात आले आहेत.