गणित पर्यायी विषय बनवता आला तर विद्यार्थ्यांना मदत होईल - हायकोर्ट
गणित हा जर पर्यायी विषय बनवता आला तर अनेक विद्यार्थ्यांना पद्वीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्यास मदतच होईल, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय. तसेच यावर तज्ञांची मतं जाणून घेऊन २६ जुलैला होणा-या पुढच्या सुनावणीला उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
मुंबई : गणित हा जर पर्यायी विषय बनवता आला तर अनेक विद्यार्थ्यांना पद्वीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्यास मदतच होईल, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय. तसेच यावर तज्ञांची मतं जाणून घेऊन २६ जुलैला होणा-या पुढच्या सुनावणीला उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
गणित हा पर्यायी विषय बनवण्याचा मुद्दा उपस्थित करताना हायकोर्टाने म्हटलंय की, साल १९७५ पर्यंत एसएससी परिक्षेला ८ विषयांपैकी एका विषयात नापास होणा-यांनाही पास केलं जायचं. त्यात गणिताचाही समावेश होता. मग आता का नाही? तसेच कला शाखेला जाऊन पद्वी घेऊ इच्छिणा-यांना गणिताचा उपयोग काय? शिक्षण मंडळांनी याचा गांभीर्यानं विचार करायला हवा, असं कोर्टानं म्हटलंय. गणिताच्या भितीने शिक्षण अर्ध्यावर सोडणा-यांना त्यांच शिक्षण पूर्ण करता येईल, असं मत न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी व्यक्त केलं आहे.