मुंबई पालिका शाळेतील मुलांच्या कुपोषणात चार पटीने वाढ
महापालिकेच्या शाळांतील मुलांच्या कुपोषणात गेल्या ३ वर्षांत चौपटीने वाढ झाल्याचा दावा प्रजा फाऊंडेशनने केला आहे.
मुंबई : महापालिकेच्या शाळांतील मुलांच्या कुपोषणात गेल्या ३ वर्षांत चौपटीने वाढ झाल्याचा दावा प्रजा फाऊंडेशनने केला आहे.
२०१३-१४ साली कुपोषित मुलांची संख्या ८ टक्के होती ती वाढून आता ३४ टक्के झाल्याचं प्रजा फाऊंडेशनचं म्हणणं आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी हा अहवाल सादर केला.
गोवंडी, मानखुर्द, सांताक्रूझ, मलबार हिल, ग्रांटरोड, चेंबूर आणि अंधेरीत परिसरात सर्वाधिक कुपोषित बालके आढळून आली आहेत. या कालावधीत माधान्य भोजन योजनेवरचा खर्च ८१ टक्क्यांवरुन ६५ टक्क्यांपर्यंत आल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवले गेले आहे.
कुपोषणात होणारी वाढ ही चिंतेची बाब असून, याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणीही प्रजा फाऊंडशनने केली आहे.