मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) आज जॉईट एंट्रंस एग्जामिनेशन (जेईई) मेन 2018 (JEE Main Exam Result 2018) चा निकाल लागणार आहे. इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी जेईई मेन परीक्षा चांगल्या मार्काने पास होने महत्त्वाचे असते. सीबीएसईची वेबसाईट cbseresults.nic.in वर हा निकाल लागणार आहे. सीबीएसईने जॉईंट एंट्रेंस एग्जामिनेशन मेन (JEE Main) परीक्षेचं आयोजन ऑफलाईन मोडमध्ये 8 एप्रिल आणि ऑनलाईन मोडमध्ये 15 एप्रिल आणि 16 एप्रिलला केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात एनआयटी, आयआयटी आणि इतर सरकारी मान्यता प्राप्त इंजिनियरिंग कॉलेजमध्ये B.Tech./BE/B.Arch कोर्सेसाठी अॅडमिशन घेण्यासाठी जेईई मेन परीक्षा आयोजित केली जाते. याशिवाय देशात अनेकख खासगी संस्था आहेत ज्या जेईई मेन रिजल्टच्या निकालावर अॅडमिशन देतात. देशातील सर्व आयआयटी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई एडवांस परीक्षा चांगल्या मार्काने पास होणे महत्त्वाचे असते. जेईई मेनमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारावर जेईई अॅडवांससाठी प्रवेश मिळतो. त्यामुळे या निकालाकडे लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.


येथे पाहा निकाल : 


http://cbseresults.nic.in/


http://results.nic.in/


https://jeemain.nic.in/webinfo/Public/Home.aspx