मुंबई : कोरोना कालावधीत देशभरातील शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद आहेत. आता हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्याले सुरु केली जात आहेत. देशातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (Jawaharlal Nehru University, JNU) सुरू होणार आहे. २ नोव्हेंबर २०२० पासून हे विद्यापीठ टप्प्याटप्प्याने उघडले जात आहे.


कोणाला मिळणार प्रवेशाची परवानगी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बराच कालावधीनंतर जेएनयू पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी मोठी तयारी करण्यात आली असून विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात, संशोधक आणि पीएचडी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये जाण्याची परवानगी आहे, ज्यांना त्यांचा प्रबंध जमा तसेच सादर करावयाचा आहे.


कोरोनाव्हायरसची स्थिती पाहता टप्प्याटप्प्याने विद्यापीठ सुरू केले जाईल, असे सांगून विद्यापीठाने यासंदर्भात अधिकृत निवेदन दिले आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पीएचडी अंतिम वर्षाचे विद्यार्थी, ९ बी विद्यार्थी आणि प्रकल्प कर्मचारी यांना परवानगी देण्यात आली आहे, ज्यांना प्रामुख्याने प्रयोगशाळांमध्ये परवानगी आहे.


दुसर्‍या टप्प्यातील तयारी


जेएनयू प्रशासनाच्या म्हणण्यानुसार विद्यापीठाचा दुसरा टप्पा १६ नोव्हेंबरपासून सुरू होईल. या कालावधीत, वसतिगृहात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये येण्याची परवानगी देण्यात येईल. जेएनयू प्रशासनाचे म्हणणे आहे की, दोन्ही टप्प्यांनंतर त्यांचा आढावा घेतला जाईल. जर हे दोन्ही टप्पे पूर्णपणे यशस्वी झाले तर पुढील तयारी केली जाणार आहे.


कोविड-१९ची स्थिती पाहून तयारी


देशभरात कोविड-१९च्या संसर्गाचा धोका लक्षात घेता विद्यापीठ परिसरातही विशेष तयारी करण्यात आली आहे. याअंतर्गत अनेक नवीन नियम बनविण्यात आले आहेत, त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.


१. कोविड-१९ चाचणी शिबीर परिसरातील स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने नियमित अंतरावर कॅम्पसमध्ये आयोजित केला जाईल.


२. केंद्रीय ग्रंथालयासह दोन्ही टप्प्यांत कॅन्टीन आणि ढाबेही बंद ठेवण्यात येतील.


३. कोणतीही व्यक्ती कोविड-१९च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.