मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठोकले मुंबई विद्यापीठच्या प्रवेशद्वाराला मध्यरात्री टाळे ठोकले. ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मुंबई विद्यापीठाचे निकाल पूर्णणे लागले नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाळे ठोकल्यानंतर मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिलेला शब्द आपण पाळला. वेळेत निकाल लावण्यात अपयशी ठरलेल्या विद्यापीठाला आपण टाळे ठोकले, असे ट्विट आव्हाड यांनी केलेय.


ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपूनही निकाल जाहीर करण्यात असमर्थ ठरलेल्या मुंबई विद्यापीठामुळे, राज्यभरातील विधी अभ्यासक्रम प्रक्रिया पुढे ढकलली होती. मात्र, ९ ऑगस्टला विधी प्रवेशाची पहिली यादी लागणार असल्यामुळे विद्यापीठातील हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत.


ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे मुंबई विद्यापीठाचा निकाल रखडला आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत निकाल जाहीर होणार नाही, याची कल्पना आल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ मागितली होती. 


तंत्रशिक्षण संचालनालायतर्फे ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ९ ऑगस्टला विधी अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडलेय.