मुंबई : शिक्षक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही अजून राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणाच सरकारकडून झालेली नाही. म्हणून तातडीनं राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्याची मागणी, शिक्षक परिषदेनं पत्राद्वारे शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात येतं. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असतं. आधी राज्य शिक्षक पुरस्कार २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी घोषित केले जायचे. 


मात्र २०१५ पासून हे पुरस्कार १५  ऑगस्टला जाहीर केले जाऊ लागले. मात्र यंदा स्वातंत्र्य दिन उलटून दोन आठवडे लोटले तरीही अजून पुरस्कारांची घोषणाच शिक्षण विभागाने केलेली नाही. यामुळे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात शिक्षक वर्गात कमालीची नाराजी पसरलीय.