मुंबई : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शहरातील शाळांना सुटी जाहीर केलेय. त्यामुळे मोर्चामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सराकरकडून दोलनकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अजून तरी मराठा क्रांती मोर्चाकडून चर्चेबाबत सरकारला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 


उद्या मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघणार असून अद्याप सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झालेली नाही. त्यामुळे मोर्चापूर्वी सरकारची आंदोलनकांबरोबर चर्चा होणार का याबाबत प्रश्नचिन्हं आहे. तर दुसरीकडे शहरातील शाळांना शिक्षण विभागाने सुटी जाहीर केलेय.


या भागातील शाळांना सुटी


दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. मराठा मार्चांमुळे शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील जवळपास ५००  शाळांना सुटी असणार आहे. 
सायन ते सीएसटी आणि वांद्रे ते माहीममधील शाळांना ही सुटी असणार आहे.