मुंबई : आकाशातून पडणारे तारे पाहायचे असतील तर आज रात्री नक्की जागे राहा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मध्यरात्री मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे.... जेमिनिडस असं या घटनेचं शास्त्रीय नाव आहे. यावेळी एकाच वेळी अनेक उल्का पृथ्वीच्या दिशेनं झेपावतात.


१३ आणि १४ डिसेंबरच्या मध्यरात्री हा उल्कावर्षाव होणार आहे. जगभरातल्या सगळ्या देशांमधून हा उल्कावर्षाव पाहता येईल. 


महत्त्वाचं म्हणजे, उल्कावर्षाव पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते. साध्या डोळ्यांना हा उल्कावर्षाव दिसणार आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये अशा प्रकारे उल्कावर्षाव होतो.