मुंबई : मुंबई विद्यापीठाची निकालाकरता आता नवी डेडलाईन समोर आली आहे. १९ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाने मुंबई हायकोर्टाकडे डेडलाईन मागितली आहे. बकरी ईद आणि गणोशोत्सवामुळे निकालाला उशीर झाल्याचा विद्यापीठाने हास्यास्पद दावा केला आहे. आता जी डेडलाईन असेल ती लिखीत द्या आणि काय काम केलं तेही सांगा असे आदेश हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन पेपर तपासणीनं निकालांसाठी देण्यात आलेल्या आजपर्यंतच्या सर्व डेडलाईन चुकवल्या आहेत. त्यात असे निकालांचे गोंधळ यांमुळे लाखो मुलांच्या अख्ख्या वर्षाची पुरेवाट लागली आहे. पदवी परीक्षांचे सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हाय कोर्टाला दिलेली ६ संप्टेंबरची डेडलाईन आज संपते आहे. पण अद्याप विविध १४ परीक्षांचे निकाल जाहीर होणं प्रलंबित आहे. शिवाय, हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.


शेकडो विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालात गैरहजर दाखवण्यात आलंय. इतकच काय तर टॉपर्स विद्यार्थ्यांना नापास करण्यात आल्याचीही अनेक उदाहरणे समोर येतायत. त्यामुळे मुंबई विद्यापीठ निकाल जाहीर करण्यासाठी आणखी किती दिवस लावणावर असा प्रश्न विचारला जातोय. विद्यार्थ्यांमधला संताप वाढत चाललंय. शेकडो विद्यार्थ्यींच्या पोस्ट ग्रॅज्यूएशनच्या संधी हुकल्या. अशात विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होतंय. पण राज्य सरकार आणि कुलपती काय दिलासा देणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागलं आहे.