नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) द्वारे लवकरच नीट पी.जी. चा निकाल जाहीर होणार आहे. बोर्डाने अद्याप नीट पी.जी 2024 च्या निकालांची निश्चित  तारीख जाहीर केलेली नाही. मात्र महिना अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. नीट 2024 चा निकाल natboard.edu.in वर प्रसिद्ध होईल. 11 ऑगस्ट रोजी झालेल्या पदव्युत्तर परीक्षेत बसलेल्या उमेदवारांच्या गुणांसह पीडीएफ स्वरूपात हा निकाल जाहीर करण्यात येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन सुचनांसाठी उमेदवारांना NBEMS ची अधिकृत वेबसाइट सतत तपासत राहवी. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांच्या आत वैयक्तिक स्कोअरकार्ड देखील जाहीर करण्यात येईल. निकाला सोबतच कट-ऑफ गुण देखील जाहीर होतील. नीट (पदव्युत्तर) परीक्षा 11 ऑगस्ट रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. सुमारे 2.2 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. देशभरातील विविध शहरांमध्ये 416 ठिकाणी ही परीक्षा घेण्यात आली.


असा डाउनलोड करा NEET PG 2024 चा निकाल


स्टेप 1: NBE च्या अधिकृत वेबसाइटला nbe.edu.in किंवा natboard.edu.in वर भेट द्या.


स्टेप 2: त्या वेबसाईटवर होमपेजवरील 'NEET PG' लिंकवर क्लिक करा.


स्टेप 3: त्यानंतर NEET PG निकाल 2024 वर क्लिक करा.


स्टेप 4: मग NEET PG चे निकाल दाखवणारी एक नवीन विंडो उघडेल. त्यातील NEET PG 2024 च्या निकालावर क्लिक करा: 


स्टेप 5: तुमचे नाव किंवा रोल नंबर वापरून तुमचा निकाल तपासा.


स्टेप 6: निकालाची PDF डाउनलोड करून सेव्ह करा.