पेटीएममध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी...तुम्हीही करु शकता अप्लाय
ई वॉलेट कंपनी पेटीएम तरुणांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध करुन देत आहे. तुम्हीही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही गुडन्यूज आहे.
मुंबई : ई वॉलेट कंपनी पेटीएम तरुणांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध करुन देत आहे. तुम्हीही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही गुडन्यूज आहे.
कंपनीमध्ये १५० पदावंर भरती केली जाणार आहे. ग्रॅज्युएटधारकांसाठी ही भरती आहे.
कुठे आहे भरती
पेटीएम कंपनीने बुधवारी या भरतीबाबत घोषणा केली. पेटीएम मॉलसाठी IITs आणि IIMsच्या १५० ग्रॅज्युएट तरुण-तरुणींची भरती केली जाणारआ हे. याशिवाय येथे BITS पिलानी, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, XLRI जमशेदपुर, ISB हैदराबाद सारख्या संस्थांमधील विद्यार्थ्यीही अर्ज करु शकतात.
ही आहे कंपनीची प्लानिंग
पेटीएम मॉलचे सीओओ अमित सिन्हा यांच्या मते कंपनीचे ध्येय देशातील टॉप एज्युकेशन संस्थांमधील तरुणांना संधी देणे आहे.