पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज
करा अर्ज आणि मिळवा नोकरी
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन तुम्हीही पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवू शकता. एक नजर टाकूयात या संपूर्ण भरती प्रक्रियेवर...
पद : एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (POWERGRID)
एकूण जागा : ३५
शैक्षणिक पात्रता : सीए / आयसीडब्ल्यूए (सीएमए)
वयोमर्यादा : ३० जून २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे तर अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षांपर्यंत सूट)
पद : एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (Power System Operation Corporation)
एकूण जागा : १२
शैक्षणिक पात्रता : सीए / आयसीडब्ल्यूए (सीएमए)
वयोमर्यादा : ३० जून २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे तर अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षांपर्यंत सूट)
ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा कालावधी :
दिनांक ९/०६/२०१८ ते दिनांक ३०/०६/२०१८
या संदर्भातील अधिक माहिती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना powergridindia.com या संकेतस्थळावर पहायला मिळेल.
अर्ज करण्यासाठी careers.powergrid.in या लिकंवर क्लिक करा.