मुंबई : बॅंकेत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालुन आली आहे. पंजाब अॅण्ड सिंध (PSB)ने मॅनेजर लॉच्या २० रिक्त जागांसाठी भरती सुरू केलीयं. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उमेदवारांना अर्जाची प्रिंटआऊट पोस्टाच्या माध्यमातून पाठवावी लागेल. ९ ऑगस्ट २०१८ ही ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. प्रिंटआऊट जमा करण्याची अंतिम तारीख १९ ऑगस्ट आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ३ किंवा ५ वर्षांची लॉ डिग्री असणे गरजेचे आहे. लॉमध्ये पीजी डिग्री असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. यासाठी २५ ते ३५ वर्षांची वयोमर्यादा आखून देण्यात आलीयं.


पगार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पात्र उमेदवारांना ३१ हजार ७०५ ते ४५ हजार ९५० पर्यंत प्रतिमाह पगार मिळेल. 


शुल्क 


सामान्य-ओबीसी वर्गातील उमेदवारांना ६०० रुपयांसोबत जीएसटी फीस भरावी लागेल. एससी/एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना १५० रुपये आणि जीएसटी द्यावी लागेल.


अशी होईल निवड 


लेखी परीक्षेनंततर ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखत


इथे करा अर्ज 


इच्छुक उमेदवार www.psbindia.com वर लॉग इन करुन अर्ज आणि इतर महत्त्वाची माहीती मिळवू शकतात.