मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण मंडळींसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून (RRB)थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल ६२९०७ पदांसाठी भर्ती केली जाणार आहे. ही भरती CPC पे मेट्रिक्स लेवल-१ साठीच्या विविध पदांसाठी असणार आहे. तसेच देशातील विविध राज्यांसाठी असणार आहे.


अर्ज करण्याची तारीख, आणि पात्रता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इच्छुक आणि पात्र उमेदमवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१८ अशी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मिळणारे वेतन १८००० रूपये इतके असणार आहे. अर्जदार उमेदवार हा कमीत कमी इयत्ता १०वी उत्तीर्ण असावा. त्याच्याकडे नॅशनल अप्रेंटसशिप सर्टिफिकेट (NAC)असणे आवश्यक आहे. तसेच, त्याचे वय १८ ते ३१ दरम्यान असावे.


'त्या' उमेदवारांना वयात सूट


दरम्यान, आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना वयाची अट शिथिल असेल. SC/ST उमेदवारांना वयात ५ वर्षांची सूट असेल. तर, OBC उमेदवारांना ३ आणि PWD उमेदवारांना १० वर्षांची सूट असेल.


उमेदवारांची निवड प्रक्रिया


उमेदवाराची निवड ही कॉम्प्यूटर निवड (CBT), फिजिकल एफिशिएंसी टेस्ट (PET) आणि पुन्हा एकदा डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशनच्या आधारे होईल.  


शूल्क अकारणी


SC/ST/ एक्स-सर्व्हिसमन /PWDs/ महिला/ट्रांसजेंडर्स/ अल्पसंख्यक आणि आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांना अर्ज शुल्क २५० रूपेये इतके असेल. शुल्क भरणा हा इंटरनेट बॅंकींग, डेबिट/ क्रेडीट द्वारे किंवा एसबीआय बॅंकेत थेट जाऊनही भरू शकता. तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनही भरू शकता.


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी


ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी   www.rrbahmedabad.gov.in वर लॉग इन करा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१८ इतकी आहे. तर, पोस्ट ऑफिसद्वारा शूल्क भरण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१८ इतकी आहे. अधीक माहितीसाठी रेल्वे बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.