मुंबई : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. पाहूयात कुठल्या पदासाठी आणि किती जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.


पद - कार्यकारी सहायक - १ जागा


शैक्षणिक पात्रता - एमबीए / पदव्युत्तर पदवी


 


शाखा अभियंता (स्थापत्य) - १ जागा


शैक्षणिक पात्रता - बी.ई (सिव्हील) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक 


 


विभाग अभियंता (विद्युत) - १ जागा


शैक्षणिक पात्रता - बी.ई (इलेक्ट्रिकल) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक


 


प्रशासकीय अधिकारी - १ जागा


शैक्षणिक पात्रता - एमबीए (Operations)/ एमबीए (HR) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक


 


संहिता लेखक/ आयईसी तज्ञ - १ जागा


शैक्षणिक पात्रता - पदवी (मास मीडिया / मास कम्युनिकेशन्स, पत्रकारिता) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक


 


ऑफिस सहाय्यक - ४ जागा


शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, एमएससीआयटी कोर्स आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.


 


अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० एप्रिल २०१८


या संदर्भातील अधिक माहिती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना http://nashikcorporation.in//upload/download/11885_SmartCityRecruitmentApril2018.pdf या संकेतस्थळावर पहायला मिळेल.