मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाबार्ड (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक)मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण ९२ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.


इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.


एक नजर टाकूयात कुठल्या पदाच्या आणि किती जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.


पद : सहायक व्यवस्थापक श्रेणी अ 


एकूण पदांची संख्या : ९२ 


खुला प्रवर्ग : ४६ जागा


पशुसंवर्धन : ५ जागा


सनदी लेखापाल (सीए) : ५ जागा


अर्थशास्त्र : ९ जागा


पर्यावरणीय अभियांत्रिकी : २ जागा


फुड प्रोसेसिंग/फुड टेक्नॉलॉजी : ४ जागा


वनीकरण (फॉरेस्ट्री) : ४ जागा


लँड डेव्हलपमेंट (सॉईल सायन्स) : ८ जागा


लघु पाटबंधारे (वॉटर रिसोर्सेस) : ६ जागा


समाजकार्य : ३ जागा


शैक्षणिक योग्यता : 


५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ एमबीए/ पी.जी डिप्लोमा (अनुसूचित जाती, जमाती तसेच अपंग उमेदवारांना ४५% गुण)


वयोमर्यादा : 


२१ ते ३० वर्षे


परीक्षा शुल्क : 


खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ८०० रुपये तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी १५० रुपये परीक्षा शुल्क


अर्ज करण्याची शेवटची तारीख :


२ एप्रिल २०१८


या संदर्भातील अधिक माहिती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नाबार्डच्या www.nabard.org या संकेतस्थळावर पहायला मिळेल.


अर्ज करण्यासाठी http://ibps.sifyitest.com/nabardpssjun17/ या लिकंवर क्लिक करा.