प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई  : मुंबई च्या  घाटकोपर पश्चिमेला असलेला पारशीवाडी हा अतिशय दाटीवाटीचा भाग.. इथेच आठ बाय दहाच्या पोटमाळ्यावर मामाकडे साक्षी गावडे राहाते..... साक्षी पाच दिवसाची असताना वडील घर सोडून गेले..... तेव्हापासून मामानंच बहिणीला आणि भाचीला सांभाळलं.... साक्षीची आई एका डॉक्टरकडे मदतनीस म्हणून जाते... एकंदरीतच परिस्थिती हलाखीची... या परिस्थितीशी झगडून साक्षीनं अभ्यास केला.. पारशीवाडीमधल्या अभ्युदय विद्यालयात साक्षीनं शिक्षण घेतलं.... कुठलीही शिकवणी न लावता दहावीच्या परीक्षेत साक्षीनं तब्बल ९४ टक्के मिळवले.


डॉक्टर व्हायचंय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेत जायचं, शाळेतल्या अभ्यासिकेत थांबून अभ्यास करायचा, घऱकामात आईला मदत करायची असा साक्षीचा दिनक्रम होता.... घरातली कामं सांभाळून साक्षीनं अभ्यास केला..... साक्षीला डॉक्टर व्हायचंय...  आणि गरिबांची सेवाही करायचीय.प्रतिकूल परिस्थीवर मात करत साक्षीनं दहावीत तब्बल 94 टक्के मिळवलेत. साक्षीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी थोडी मदतीची गरज आहे.... तिला मदत करण्यासाठी पुढे या..  तिच्या पंखांना बळ द्यायला पुढे या... 


संघर्षाला हवी साथ 


गुणवंतांच्या संघर्षाला 'झी २४ तास'चा मदतीचा हात


तुम्हालाही मदत करायची असल्यास संपर्क करा 


संपर्क क्रमांक : ०२२ - ७१०५५०२६


पत्ता : झी २४ तास, १४ वा मजला, 


ए विंग, मॅरेथॉन टॉवर, 


लोअर परळ, मुंबई - ४०००१३


ई-मेल : havisaath@gmail.com