नवी दिल्ली : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल. या भरती प्रक्रीयेसाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे. त्यामुळे पदवीधर असलेल्या तरुणांसाठी नोकरी मिळविण्याची ही एक सुवर्णसंधीच आहे.


एसएससी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने उपनिरीक्षक पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. 


पद आणि पदांची संख्या : 


उपनिरीक्षक (जनरल ड्यूटी) (केंद्रीय सशस्त्र पोलिस दल) : १०७३ जागा


उपनिरीक्षक (दिल्ली पोलीस) : १५० जागा


शैक्षणिक पात्रता : 


पदवीधर


वयोमर्यादा : 


२० ते २५ वर्षे 


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 


२ एप्रिल २०१८


या संदर्भातील अधिक माहिती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना http://www.ssc.nic.in/SSC_WEBSITE_LATEST/notice/notice_pdf/noticesicpo2018_03032018.pdf या संकेतस्थळावर पहायला मिळेल.


अर्ज करण्यासाठी http://164.100.129.99/sicpo2018/ या लिकंवर क्लिक करा.