नवी दिल्ली : सध्या सर्वत्र शालेय आणि महाविद्यालयीन परिक्षा सुरु आहेत. विद्यार्थी अभ्यास करुन चांगले मार्क्स मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेत अशी काही उत्तर लिहीली आहेत जी पाहून तुम्हालाही धक्का बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासताना असा प्रकार उघडकीस आला आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. होय, कारण परीक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचं तुम्ही आतापर्यंत ऐकलं असंल. मात्र, आता विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले मार्क्स मिळावे यासाठी अजब-गजब विनंती केल्याचं समोर आलं आहे.



पास होण्यासाठी कुणी लवस्टोरी सांगितली आहे, कुणी इनोशनल ब्लॅकमेल करत आहे तर कुणी चक्क उत्तर पत्रिकेत नोटाचं चिटकवल्या आहेत. अशाच काही उत्तर पत्रिकांचे फोटोज समोर आले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेत चक्क १००-१०० रुपयांच्या नोटा चिटकवून शिक्षकांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं उघडकीस आलयं. तर, काही उत्तर पत्रिकेत शिक्षकांना इमोशनल ब्लॅकमेल करुन मार्क्स देण्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. तर, कुणी आपले आई-वडील नसल्याचं सांगत पास करण्याची विनंती केली आहे.



मुझफ्फरनगरमधील माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी ४ सेंटर बनवण्यात आले आहेत. यामध्ये पहिलं सेंटर राजकीय इंटर कॉलेज, दुसरं डीएव्ही इंटर कॉलेज, तिसरं इस्लामिया इंटर कॉलेज आणि चौथं ग्रेन चेंबर इंटर कॉलेज आहे. 



ज्यावेळी झी मीडियाने कॉलेजचे प्राचार्य रमेश चंद्र शर्मा यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, उत्तर पत्रिका तपासण्याचं काम सुरु आहे. तपासण्याचं काम संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत करण्यात येत आहे. तसेच सीसीटीव्ही सुद्धा सर्व ठिकाणी लावण्यात आले आहेत.