मुंबई : काही दिवसांपूर्वीच हिंदी मीडियम हा इरफान खान स्टारर सिनेमा प्रदर्शित झाला. भारतीय शिक्षणव्यवस्थेमध्ये इंग्रजीचं वाढत चाललेलं प्रस्थ, इंग्रजी शिकण्यासाठी पालकांकडून केला जाणार अट्टाहास, त्यासाठी काहीही करायला तयार असणारे पालक या मुद्दयांवर या सिनेमाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या अट्टाहासापायी पालक आपल्याच मुलाचे किती नुकसान करतात याचा जाणीव त्यांना नसते. आपल्या मुलाला इंग्रजी आलेच पाहिजे नाहीतर त्याचे आयुष्यात खूप मोठे नुकसान होऊ शकते असा काहीसा समजच हल्ली पालकांचा झालाय. त्यामुळे बाळ जन्माला आल्या आल्या त्या कानावर हल्ली आई बाबा असे शब्द पडण्याऐवजी मॉम, डॅड असे शब्द पडतात. अ आईचा नसतो तर ए अॅपल असेच अवघ्या पहिल्या वर्षापासून मुलाला शिकवले जाते. हे सारं पाहिल्यावर इतक्या लहान वयापासून इंग्रजीचा इतका भडिमार का? असा प्रश्न पडतो. 


सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. तिच्या वयाचा अंदाज पाहता ती प्ले ग्रुपमध्ये जात असावी. ज्या वयात चिमुकलीलाल बागडायचेय, मनसोक्त खेळायचे तिथे तिच्याकडून इंग्रंजीत वाक्ये म्हणून घेतली जातायत. 


बरं टीचर म्हणत असलेल्या अनेक इंग्रजी वाक्यांचा तिला अर्थही लागत नाहीये. मात्र तिने संभाषण इंग्रंजीतच करावे असा त्या टीचरचा अट्टाहास आहे. इंग्लिश कळत नसतानाही या मुलीशी शाळेतली शिक्षिका जबरदस्ती इंग्लिशमध्ये बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही मुलांना इंग्लिश मीडियममध्ये पाठवताना विचार कराल. हा व्हिडिओ नेमक्या कोणत्या शाळेचा आहे हे अजूनही कळू शकलेलं नाही पण या व्हिडिओवरून सोशल नेटवर्किंगवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत