राज्यपालांनी प्रश्नाला उत्तर न देता महिला पत्रकाराच्या गालाला लावला हात
महिला पत्रकाराने राज्यपालांना प्रश्न विचारला. मात्र, उत्तर देण्याचे टाळून तिच्या गालाला हात लावला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय.
चेन्नई: महिला पत्रकाराने राज्यपालांना प्रश्न विचारला. मात्र, उत्तर देण्याचे टाळून तिच्या गालाला हात लावला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. आधीच राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या या कृतीबाबत संताप व्यक्त होत आहे.तामिळनाडूत सेक्स फॉर डिग्री प्रकरण गाजत आहे. त्यातच राजपालांनी असे कृत्य केल्याने वाद अधिकच चिघळलाय. द्रमुकच्या राज्यसभेच्या खासदार कनिमोळी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला. राज्यपालांनी आपल्या मर्यादा समजायल्या हव्यात. त्यांनी महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला आहे. त्यांनी तिचा सन्मान राखलेला नाही, असे म्हटलेय.
सेक्स फॉर डिग्री प्रकरण
सेक्स फॉर डिग्री प्रकरण सध्या गाजत आहे. परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी मदुराई कामराज विद्यापीठातील वरिष्ठांशी 'संबंध' ठेवावे लागतील, अशी 'ऑफर' विरुधुनगर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिकेने चार विद्यार्थिनींना दिली होती. याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.या प्रकरणाचा संबंध थेट राज्यपालांशी असल्याने तामिळनाडूत वातावरण तप्त आहे. त्यातच पत्रकार परिषदेनंतरचा हा प्रकार पुढे आल्याने त्यात अधिक भर पडली आहे.
पुरोहित पुन्हा एकदा वादात
'सेक्स फॉर डिग्री' याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका महिला पत्रकाराने त्यांना प्रश्न केला. मात्र, राज्यपालांनी उत्तर न देता महिला पत्रकाराच्या गालाला संमतीविना स्पर्श केला. त्यामुळे पुरोहित पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
महिला पत्रकाराकडून तीव्र संताप
सेक्स फॉर डिग्री प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत केलाय. राज भवनात ही पत्रकार परिषद झाली. मात्र याठिकाणी राज्यपालांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला. यानंतर महिला पत्रकारानं ट्विट करत याबद्दल संताप व्यक्त केला. 'पत्रकार परिषद संपताना मी तामिळनाडूच्या राज्यपालांना प्रश्न विचारला. मात्र उत्तर देण्याऐवजी त्यांनी माझ्या संमतीविना माझ्या गालाला स्पर्श केला,' असं महिला पत्रकारानं ट्विटमध्ये म्हटलंय. तर दुसरीकडे द्रमुकच्या राज्यसभेच्या खासदार कनिमोळी यांनी निषेध व्यक्त केलाय. दरम्यान, राज्यापाल बनवारीलाल पुरोहित यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी या महिला पत्रकाराने केली आहे.