मुंबई : तुम्ही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. हल्ली आधारकार्ड सर्वच कामांसाठी गरजेचे झाले आहे. बँक अकाऊंट असो वा मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य झालेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्यांसाठी महत्त्वाचे ठरणारे आधारकार्ड बनवणारी UIDAIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. वरिष्ठ पदापासून ते कनिष्ठ पदापर्यंत अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत. 


संस्थेकडून डेप्युटी डायरेक्टर, सीनियर अकाऊंट ऑफिसर, असिस्टंट अकाऊंट ऑफिसर, प्रायव्हेट सेक्रेटरी, असिस्टंट सेक्शन ऑफसर या पदांसाठी भरती निघाली आहे. तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी ही मोठी संधीच आहे. देशांतील विविध भागांमध्ये ही भर्ती होत आहे. 


कोणकोणत्या ठिकाणी होणार भर्ती


UIDAIच्या हैदराबाद, नवी दिल्ली, मानेसर, गुवाहाटी, बंगळूरु, रांची, चंदीगढ आणि मुंबई सेंटरमध्ये भर्ती होत आहे.


कोणत्या पदांसाठी होतेय भरती


संस्थेकडून डेप्युटी डायरेक्टर, सीनियर अकाऊंट ऑफिसर, असिस्टंट अकाऊंट ऑफिसर, प्रायव्हेट सेक्रेटरी, असिस्टंट सेक्शन ऑफसर या पदांसाठी भरती निघाली आहे.


कसा कराल अर्ज?


भर्तीशी संबंधित माहितीसाठी तुम्ही uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्या. त्यावर about UIDAI यावर क्लिक करा. यात तुम्हाला करंट व्हॅकॅन्सी ऑप्शन दिसेल. येथे क्लिक केल्यानंतर प्रत्येक ठिकाणच्या भर्तीबाबत माहिती मिळेल. 


काय आहे अंतिम तारीख?


UIDAIमध्ये विविध पदांसाठी होत असलेल्या भर्तीसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ५ फेब्रुवारी आहे. त्यामुळे या पदांसाठी अर्ज करत असाल तर लवकरात लवकर करा. 


काय आहे पात्रता?


UIDAIमध्ये होत असलेल्या विविध पदांसाठी विविध पात्रता आहेत. ग्रॅज्युएटपासून ते बीएसटी आणि डिप्‍लोमा होल्डर्ससाठीही भर्ती होत आहे.