मुंबई : व्हॅलेंटाईन डे साठी सध्या तरूणाई वेगवेगळे प्लॅन्स करत आहेत. त्यासाठी कपल्स आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी स्पेशल जागा शोधत असतील. त्यासोबतच हा दिवस कसा खास, नेहमी स्मरणात राहणारा करता येईल याचाही विचार सुरू असेल. 


तरूणाई करतीये ही चूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा दिवस खास करण्याच्या नादात तरूणाई एक चूक करत आहेत. ती म्हणजे एकाच प्रकाररे डेट प्लॅन करणे. जर दरवर्षी तुम्ही वेगवेगळं गिफ्ट देता तर पुन्हा पुन्हा त्याच बोरिंग हॉटेलमध्ये जाऊन का वेळ घालवता? हा व्हॅलेंटाईन डे नेहमीसाठी यादगार करण्यासाठी आम्ही काही खास आयडिया देत आहोत. 


काय खास करता येईल?


- पिकनिकला जाऊ शकता


लंच, चॉकलेट, फ्रुट्स आणि मॅट घेऊन बाहेर पडा. तसंच जसे बालपणी जात होते. सोबत वेळ घालवण्यासाठी साप शिडी, कॅरम किंवा आणखीही काही गेम्स घेऊन जाऊ शकता. 


- लॉंग ड्राईव्हही चांगला पर्याय


एखाद्या हॉटेलमध्ये एका कोप-यात हातात हात घेऊन वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही लॉंग ड्राईव्हला जाऊ शकता. सर्वांपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात चांगला वेळ घालवू शकता. सोबत तुमच्या आवडीची गाणी असतीलच.


- खेळ खेळून एन्जॉय करा


ही आयडिया त्या खास लोकांसाठी आहे ज्यांची मुलं आहेत किंवा जे लोक फॅमिलीसोबत राहतात. तुम्ही व्हॅलेंटाईन डे ला क्रिकेट, लपाछपी, बॅडमिंटन किंवा आणखीही काही खेळ खेळून मजा करू शकता.


- बालपणीच्या आठवणी ताज्या करा


जर तुम्ही तुमच्याच शहरात असाल तर त्या जागांना भेट द्या, ज्या जागांवर तुमचं बालपण गेलंय. जर घरापासून दूर असाल तर मित्रांसोबत रियूनियन करू शकता


- ऎतिहासिक स्थळांवर भटकंती


एक किंवा दोन नाही तर अशी अनेक लोकं आहेत जी आपल्याच शहरातील ऎतिहासिक शहरं बघत नाहीत. ही स्थळं पाहण्यासाठी परदेशातून लोक येतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही या सर्व जागांवर भटकंती करू शकता.