बर्थडे गर्ल दीपिका पादुकोनच्या १० खास गोष्टी!
अभिनेत्री दीपिका पादुकोन आज तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने तिच्या काही खास आणि माहिती नसलेल्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊ आलो आहोत.
मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोन आज तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने तिच्या काही खास आणि माहिती नसलेल्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊ आलो आहोत.
- दीपिकाला व्हॅक्यूम क्लीनर व्हायचंय...
तुम्हाला वाटत असेल ही काय फालतुगिरी आहे. पण हे खरं आहे आणि त्याचं कारणही तितकच महत्वाचं आहे. तिच्या एका फॅनने तिला एकदा एका फेसबुक लाईव्हमध्ये विचारले होते की, तूला कोणती सुपर पॉवर तुझ्याकडे ठेवायची आहे. त्यावर दीपिकाने व्हॅक्यूम क्लीनर असे उत्तर दिले. कारण तिला अजिबातच धूळ सहन होत नाही.
- या हिरोसोबत पुन्हा पुन्हा कराचंय काम...
तुम्हाला वाटलं असेल की, दीपिकाने बॉयफ्रेन्ड रणवीर सिंहचं नाव घेतलं असेल. पण तसं नाहीये. दीपिकाला ‘पीकू’मध्ये तिच्यासोबत असलेल्या इरफान खान या अभिनेत्यासोबत पुन्हा पुन्हा काम करायला आवडेल, असे सांगितले होते.
- मनात नेहमी काय चालू असतं?
‘मी खूप शांत राहते आणि लोकांचं निरीक्षण करते. कॅफेमध्ये, एअरपोर्ट्वर मी विचार करत असते की, त्यांची कहाणी काय आहे. ते कुठून आले आहेत. माझ्या मनात अशा कहाणी सुरू असतात’.
- दीपिकाला घरची कामं पसंत
दीपिकाने सांगितले होते की, रिकाम्या वेळात तिला घरी राहणं आणि घरातील कामं करणं पसंत आहे. जेव्हा हॉलिवूड सिनेमाचं शूटिंग टोरोंटोमध्ये करत होती तेव्हा तिला चार महिने एकटं रहावं लागलं होतं. त्यावेळी ती स्वत:साठी जेवण बनवणे, घराची सफाई करणे आणि कपडे धुणे पसंत होतं.
- यावर दीपिकाचं प्रेम
नाही...नाही....पुन्हा रणवीरचं नाव तुम्ही शोधत असाल तर चूक करताय. दीपिकाचं सर्वात जास्त प्रेम झोपेवर आहे. तिला झोपणे खूप पसंत आहे आणि ती कुठेही झोपू शकते.
- जीनीकडून काय हवंय?
परफेक्ट फिगरसाठी दीपिका जिममध्ये मेहनत घेते. पण त्याचाही कंटाळा येतोच. यावर दीपिका म्हणाली होती की, ‘जर वर्कआऊट शिवाय फिगर परफेक्ट राहिला असता’.
- कोणता रोल पुन्हा करायचाय?
जेव्हा दीपिकाला विचारण्यात आले की, तूला कोणती भूमिका पुन्हा करायची आहे. तर तिने कशाचाही विचार न करता उत्तर दिले ‘पीकू’. तिला ही भूमिका पुन्हा साकारायची आहे.
एक सीन ऎकून या सिनेमाला होकार...
दीपिकाने सांगितले की, ‘पीकू या सिनेमाला होकार देण्यासाठी पूर्ण स्क्रिप्ट ऎकण्याची गरजच पडली नाही. जेव्हा सूजितने सिनेमाचा पहिला सीन ऎकवला तेव्हाच मी सिनेमाला होकार दिला होता.
- ही गोष्टी नेहमी असते सोबत...
दीपिका कुठेही बाहेर जाताना सोबत एका पाऊचमध्ये सेफ्टी पिन, सुई-धागा, हूक, बॅंडऎड, नेल फायलर, बिस्कीट, मिंट आणि पर्फ्यूम सोबत ठेवते.
- टीकेचा सामना कशी करते
‘मी माझ्या वडीलांकडून खूप शिकले आहे. आपल्या प्रायोरिटींवर फोकस करणे गरजेचे असते. तुमच्या जीवनात काय आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं. टीका चांगली गोष्ट आहे. मी एक खेळाडू असल्याने टीकेकडे सकारात्मक दृष्टीने बघते’.