सामान्य जनतेपासून बॉलिवूडपर्यंत 10 Year Challenge चे वारे वाहू लागलेत. अभिनेता ऋषी आणि नीतू कपूर यांनीही फोटो शेअर केला आहे. नीतू कपूर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. ऋषी कपूर सध्या एका मोठ्या आजाराशी झुंज देत आहेत. ऋषी कपूर यांच्यावर उपचार सुरु असल्यामुळे हे जोडपे न्यूयॉर्कमध्ये आहे. नीतू कपूर यांनी ऋषी कपूरसोबतचा लंच डेटवरील फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ऋषी कपूर यांचे लक्ष दुसरीकडे असल्याचे दिसते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



ऋषी आणि नीतू कपूर यांच्या लग्नाला ३८ वर्षे झाली आहेत. मी ऋषींसोबत फोटो घेण्याचा प्रयत्न करते आहे. पण ते मात्र फोनमध्ये हरवले आहेत. त्यांना माझ्याकडे बघायला वेळच नाही, असं कॅप्शन नीतू यांनी या फोटोला दिलं आहे. 10 Year Challeng स्वीकारुन नीतू यांनी हा फोटो शेअर केला आहे. नीतू कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषी कपूर यांच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात.
 
नीतू कपूर सतत फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असतात. नु्कताच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने साखरपुडा करणार असल्याचे समोर आले.आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने साखरपुडा करावा अशी नीतू कपूर आणि कपूर कुटुंबीटांची इच्छा आहे. भट्ट कुटुंबीटांची सुध्दा हिच इच्छा आहे.आलिया भट्ट अनेक वेळा कपूर कुटुंबीयांसोबत वेळ घलवताना दिसली आहे.