मुंबई : बालकलाकार म्हणून मालिका आणि सिनेमांत काम करणारी अभिनेत्री जन्नत जुबीर रहमानी सध्या तू आशिकी या मालिकेचे शूटिंग करत आहे. या मालिकेत ती पंक्तीची भूमिका साकारत आहे. सध्या मालिकेत पंक्ती आणि अहान यांची प्रेमकहाणी दाखवली जात आहे. या मालिकेच्या शूटिंग दरम्यान झालेल्या एका घटनेमुळे जन्नतची आई भडकली. अहान आणि पंक्तीमध्ये शूट झालेल्या एका सीनवरून त्या चांगल्याच भडकल्या.


अशा प्रकारच्या सीन्सला मर्यादा असाव्यात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेत अहानची भूमिका रित्विक अरोरा करत आहे. पंक्तीचे गायिका बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी अहान पूर्ण प्रयत्न करत असतो. याच वेळी दोघांमध्ये एक लव्ह सीन शूट करण्यात आला. ते मात्र जन्नतच्या आईला खटकले आणि मालिकेत अशा प्रकारच्या सीन्सला मर्यादा असाव्यात असे त्यांनी म्हटले आहे. 


आईचा स्पष्ट नकार 


या लव्ह सीनमध्ये अहान आणि पंक्तीमध्ये किंसिंग सीन होणार होता. मात्र हे जन्नतच्या आईला मान्य नव्हते. तेव्हा निर्माते आपली बाजू मांडू लागले. त्यावर होत असलेल्या चर्चेचे रुपांतर वादात झाले. खरंतर जन्नत फक्त १६ वर्षांची असून तिने ऑनस्क्रीन असे सीन्स करण्यास तिच्या आईचा स्पष्ट नकार आहे.