मुंबई : आमीर खानने बॉलिवूड दिग्गज अभिनेता सुनील दत्त यांच्यासोबतची 1993 च्या मुंबई दंगलीतील एक आठवण शेअर केली आहे. आमीर खानने एक धक्कादायक आठवण सांगितली आहे. आमीर खानने दत्त साहेब यांच्यासोबत महात्मा गांधीच्या प्रतिमेखाली एक रात्र काढली असल्याचं सांगितलं आहे. 93 च्या दंगलीत आमीर खानने सुनील दत्त आणि इतर फिल्म इंडस्ट्रीतील 3 व्यक्तींसोबत एक रात्र घालवली होती जी अजूनही मला लक्षात असल्याच सांगितलं आहे. 


काय म्हणाला आमीर खान?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिरने सांगितलं की, जेव्हा 1993 च्या वेळी मुंबईत दंगल झाली तेव्हा फिल्म इंडस्ट्रीने एक मंडळ मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. ज्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सेनेची मागणी केली असून दंगल शमवण्यासाठी जे करता येईल ते करा असं सांगितलं होतं. जवळपास 30 ते 40 लोकं मुख्यमत्र्यांना भेटायला कार्यालयात गेले. तेव्हा त्यांनी महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ सगळ्यांनी एकत्र येऊन निदर्शने करण्याचं ठरवलं. आणि जेव्हापर्यंत ही दंगल थांबणार नाही तोवर ही निदर्शने सुरू असणार असल्याचंही सांगितलं. तेव्हा पहिल्या रात्री मी, दत्त साहेब, यश चोप्रा, जॉनी वॉकर आणि एक प्रोड्युसर असे पाच लोकं त्या रात्री थांबलो अशी आठवण आमीर खानने शेअर केली आहे. 


या दिग्गज व्यक्तींसोबत घालवेली रात्र आठवत दंगल अभिनेता आमीर खानने आठवणींना उजाळा दिला आहे. आमीर पुढे म्हणाला की, त्या रात्री या मंडळींनी आपल्या करिअरच्या अनेक गोष्टी सांगितल्या. मी त्यांच्या करिअरच्या गोष्टी ऐकत होतो. तो काळ खूप चांगला होता अशी आठवण आमीरने शेअर केली आहे.