मुंबई : बहुप्रतिक्षित हॉलिवूड चित्रपट 'एव्हेन्जर एन्डगेम' २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना या चित्रपटाबाबत उत्सुकता होती. आता या चित्रपटाच्या कमाईचे थक्क करणारे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. एकीकडे चीममधील बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने जबरदस्त कमाई केली तर भारतातही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने कोटींचा गल्ला पार केला आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अॅव्हेंजर एन्डगेम'ने भारतात पहिल्याच दिवशी जवळपास ६३.२१ कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'एव्हेन्जर एन्डगेम' हिंदीसह तमिळ आणि तुलुगूमध्येही प्रदर्शित होत असल्याने चित्रपटाला आणखी फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


याआधी 'Avengers Endgame'ने चीनमध्ये प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ५४५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. चित्रपटाने चीममध्ये पेड प्रीव्यूच्या रुपात १९३ कोटींहून अधिक कमाई केली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 'अॅव्हेंजर एन्डगेम'ने ५४५ कोटी जमावले. आता पेड प्रीव्यूची रक्कम एकत्र करत चीनमध्ये चित्रपटाने पहिल्या दिवशी ७४३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 



‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या 'एव्हेन्जर' सीरीजचा शेवटचा भाग 'एन्डगेम'बाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. चीममधील कमाईचे आकडे पाहता 'Avengers Endgame' बॉलिवूडमध्येही तुफान गाजणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 'अॅव्हेंजर एन्डगेम'मुळे बॉलिवूडच्या इतर चित्रपटांना याचा फटका बसण्याचा शक्यता आहे. मे महिन्यात बॉलिवूडचे 'स्टूडंट ऑफ द इयर', आणि 'ब्लॅक' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या दोन चित्रपटांना नुकसान होऊ शकते.