मुंबई : जगभरात जिथे थंडीने सगळं गारटलं असताना रजनीकांत स्टारार '2.0'ने मात्र बॉक्स ऑफिसवर आपली गर्मी कायम ठेवली आहे. देशभरात रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा '2.0' हा सिनेमा चांगल बॉक्स ऑफिस कलेक्शन करत आहे. रिलीजच्या 2 आठवड्यानंतरही या सिनेमाची कमाई थांबायचं नाव घेत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीकांतचे चाहते या सिनेमाचे 700 करोड रुपये बॉक्स ऑफिस कलकेश्न होण्याची वाट पाहत आहेत. बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीनुसार दोन आठवड्यात या सिनेमाने जवळपास 500 करोड रुपयांचा जवळचा आकडा गाठला आहे. 


त्यामुळे चाहते देशभरात कधी एकदा 500 करोड रुपयांचा आकडा गाठतो याची वाट पाहत आहेत. तर तिथेच वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये हा 700 करोड रुपयांची कमाई पूर्ण करणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये वेगळाच आनंद आहे. 



रजनीकांत यांचा हा सिनेमा लवकरच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'दंगल' सिनेमाला मागे टाकत देशातील तिसरा मोठा सिनेमा बनणार आहे. दोन आठवड्यात या सिनेमाने नेट बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये जवळपास 380 करोड रुपयांची कमाई केली आहे. तर ग्रास कलेक्शन 480 करोड रूपयांच्या जवळपास आहे. 


अक्षयचा सर्वात मोठा सिनेमा 


2.0 हा सिनेमा अक्षय कुमारकरता कोणत्या लॉटरीपेक्षा कमी नाही. हा सिनेमा आतापर्यंत अक्षयचा सर्वात हिट सिनेमा ठरला आहे. अक्षय कुमारला नकारात्मक भूमिका लकी ठरली आहे. तिथेच कमाईची गोष्ट कराल तर हे असचं सुरू राहिलं तर 2019 मध्ये देखील हा सिनेमा सर्वाधिक कलेक्शन करेल. 


नुकताच रजनीकांत यांचा वाढदिवस झाला त्यांनी आपला 68 वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. 2.0 हा सिनेमा रोबोटचा पुढील भाग आहे. या सिनेमाने रिलीजच्या अगोदरच 490 कोटी रुपयांची कमाई करून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता.