मुंबई : चित्रपट कलेमध्ये प्रचंड मेहनत आणि योगदानातून काही अफलातून कलाकृती सादर करणाऱ्या कलाकारांसाठी कोणताही पुरस्कार सोहळा हा जणू एक परवणीच असतो. त्यातही काही पुरस्कार सोहळ्यांना कलाकार आणि प्रेक्षकांची विशेष पसंती. याच पुरस्कारांपैकी एक म्हणजे आयफा IIFA Awards 2019. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत यंदा भारतातच पाहायला मिळाली. स्वप्ननगरी मुंबईतच हा दिमाखदार सोहळा पार पडला. ज्यामध्ये या शहराला एकिकडे पावसाने झोडपून काढलेलं असतानाही कलाकारांनी मात्र तितक्याच उत्साहाने या सोहळ्याला उपस्थितीत दर्शवत त्याची शोभा वाढवली. चित्रपट कलेचा गौरव होणाऱ्या या समारंभात युवा कलाकरांचा उत्साह पाहण्याजोगा होता. चला तर मग जाणून घेऊया या पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाने मारली बाजी आणि कोण ठरलं  सर्वोत्कृष्ट.... 


सर्वोत्कृष्ट चित्रपट- राझी 


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (राझी) 



सर्वोत्कष्ट अभिनेता- रणवीर सिंग (पद्मावत)



सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- श्रीराम राघवन (अंधाधुन) 


(आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- दीपिका पदुकोण 



(आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर 


सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री- अदिती राव हैदरी (पद्मावत) 


सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता- विकी कौशल (संजू) 


सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री - सारा अली खाल (केदारनाथ) 



सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- इशान खट्टर 


गेल्या २० वर्षांमधील सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम 


गेल्या २० वर्षांतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राजकुमार हिरानी (संजू)


सर्वोत्कृष्ट संगीत- सोनू के टिटू की स्वीटी 


सर्वोत्कृष्ट कथा- अंधाधुन 


जीवनगौरव पुरस्कार - ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी 


सर्वोत्कृष्ट गीतकार - अमिताभ भट्टाचार्य (धडक) 


सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजित सिंग (ए वतन- राझी)


सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- हर्षदीप कौर (दीलबरो- राझी)