मुंबई : बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट - एक प्रेम कथा’ या सिनेमाच्या कमाईची घोडदौड सुरूच आहे. हा सिनेमा रिलीज होऊन आता दोन आठवडे उलटले असून आतापर्यंत या सिनेमाने ११५.०५ कोटींची कमाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुस-या आठवड्यात या सिनेमाने शुक्रवारी ४ कोटी, शनिवारी ६.७५ कोटी आणि रविवारी ८.२५ कोटींची कमाई केली. 



ट्रेड अ‍ॅनलिसीस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली. अक्षयच्या या सिनेमाला इतकी पसंती मिळत आहे की, या सिनेमाने केवळ ८ दिवसातच १०० कोटीच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. अक्षय कुमारच्या या सिनेमाचं तोंडभरून कौतुक होत असून या सिनेमासोबतच अक्षयचा हा पाचवा लगातार सुपरहिट सिनेमा आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, टॉयलेट एक प्रेम कथा हा सिनेमा केवळ १८ कोटींमध्ये तयार करण्यात आलाय. सध्याची कमाई पाहता सिनेमाने तिप्पट कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी १३ कोटींची कमाई केली होती.