Akhil Mishra Passes Away : बॉलिवूड जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. थ्री इडियट्ससह (3 idiots) अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा (Akhil Mishra) यांचे निधन झालं आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामुळे त्यां मृत्यू झाला आहे. अखिल मिश्रा यांनी आपल्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांवर छाप पाडली होती. मिश्रा यांची 3 इडियट्स या चित्रपटातील ग्रंथपाल दुबे यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखिल मिश्रा यांच्या निधनाची माहिती त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सुझान बर्नेट यांनी दिली आहे. ही घटना घडली तेव्हा त्याची अभिनेत्री सुझान बर्नेट शूटिंगसाठी हैदराबादमध्ये होत्या. ही बातमी ऐकून त्या लगेच परतल्या आहेत. अहवालानुसार, अभिनेते अखिल मिश्रा हे स्वयंपाकघरात काम करत होते आणि त्यावेळी पाय घसरुन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मिश्रा यांच्या निधनाची बातमी कळल्यापासून सुझान यांना धक्का बसला आहे. 


अखिल मिश्रा यांच्या निधनानंतर पत्नी सुझान यांनी, 'माझे हृदय तुटले आहे, माझा जीवनसाथी गेला आहे,' असे म्हटलं आहे. अखिल मिश्रा यांनी उत्तरन, भंवर, उडान, सीआयडी, भारत एक खोज या शोमध्ये काम केले होते. आमिर खानच्या 3 इडियट्स या चित्रपटातील ग्रंथपाल दुबेच्या भूमिकेतून अखिल मिश्रा हे खूप लोकप्रिय झाले होते. त्यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. अखिल मिश्रा यांनी  डन, वेल डन अब्बा, हजारों ख्वाहिशें ऐसी या चित्रपटात काम केले होते.


अखिल मिश्रा यांनी जर्मन अभिनेत्री सुझान बर्नेटशी लग्न केले होते. सुझान बर्नेट यांनी ये रिश्ता क्या कहलाता है, चक्रवर्ती अशोक सम्राट, कसौटी जिंदगी की यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. सुझान बर्नेटने एका मुलाखतीत खुलासा केला होता की,  पती अखिल मिश्राने तिला हिंदी शिकण्यासाठी खूप मदत केली होती.