मुंबई : बॉलिवूडमध्ये एक सात्विक आणि सोज्वळ चेहरा साऱ्यांच्या स्मरणात राहतो तो म्हणजे अभिनेत्री रेणुका शहाणेचा. पण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेणुका शहाणेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच काहीसं आहे. महत्वाची बाब म्हणजे हा फोटो रेणुका शहाणेंचा आहे यावर कुणाचा विश्वास दिसणार नाही. कायम उत्साही आणि हसरा चेहरा असणाऱ्या शहाणे या फोटोत अगदी चिंतेत ग्रस्त दिसत आहेत. 


रेणुका शहाणेचा हा लूक 



या फोटोमध्ये त्या चक्क वृद्ध अवतारात पाहायला मिळत आहेत. आता रिअल लाइफमध्ये कायमच चिरतरुण वाटणा-या रेणुका शहाणे यांचा हा फोटो कसला आणि कधीचा असे प्रश्नही रसिकांना पडले असतील. या फोटोमागचं खरं गुपित म्हणजे हा रेणुका शहाणे यांच्या आगामी सिनेमातील हा लूक . या सिनेमाचं नाव "३ स्टोरीज" असं आहे. या सिनेमाचं नुकतंच पोस्टर लॉन्च करण्यात आलं. यात रेणुका शहाणे या गोव्यातील वृद्ध महिलेच्या अवतारात पाहायला मिळत आहेत. आजवर रेणुका शहाणे या अशा अवतारात रुपेरी पडद्यावर दिसल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांचा हा नवा लूक आणि भूमिका याविषयी रसिकांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमात रेणुका यांच्यासह शरमन जोशी, रिचा चढ्ढा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.अर्जुन मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा १६ फेब्रुवारीला २०१८ रसिकांच्या भेटीला येणार आहे.