रिऍलिटी शो दरम्यान अभिनेत्याचा मृत्यू
35 वर्षीय मॉडेलचा मृत्यू
मुंबई : ताइवानमध्ये जन्मलेला अभिनेता आणि मॉडेल गॉडफ्रे गाओ (Godfrey Gao) चा टीव्ही शो दरम्यान मृत्यू झाला आहे. 35 वर्षांच्या गॉडफ्रेचा रिऍलिटी शो 'चेज मी'च्या सेटवर अचानक पडल्याने अपघाती मृत्यू झाला. त्याच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबिय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
जेट स्टार एंटरटेनमेंटच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल झालं. जेथे जवळपास तीन तास त्याच्यावर उपचार करण्यास आले. मात्र एवढं करूनही डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. चेज मी च्या अकाऊंटवर बुधवारी अधिकृतरित्या सांगण्यात आले की, गाओचा मृत्यू हा नवव्या एपिसोडच्या चित्रीकरणा दरम्यान झाला. धावता धावता तो अचानक पडला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने गॉडफ्रेचा मृत्यू झाला आहे.
गॉडफ्रेच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांना आणि प्रियसीला माहिती देण्यात आली. गुरूवारी त्याचा मृतदेह ताइवानमध्ये आणण्यात आली. काही दिवसांपूर्वी कोरियाची पॉप गायिका गू हाराला तिच्याच घरी मृतावस्थेत पाहण्यात आलं.
2011 साली लक्झरी ब्रँड लुई विटॉनच्या जाहिरातीसाठी निवड झालेल्या पुरूषांमध्ये गाओ पहिला एशियाई पुरूष मॉडेल होता. त्यानंतर त्याने हॉलिवूडमध्ये त्याची ओळख बनवली. 'द मोर्टल इंस्ट्रूमेंट्स: सिटी ऑफ बोन्स'मध्ये गाओने अभिनय केला आहे. गाओ चीनमधील प्रचलित नाव आहे.